दिवस गेला कि नवीन आठवण येते
जुन्या दिवसाची अपेक्षा कमी होते
नवीन दिवस नेहमीच येतात
पण पुन्हा त्याच वेळेची आठवण येत आहे …
महासागराची भीती सर्वांनाच वाटते
वेळ आली कि ती पण क्षणात कमी होते ..
तीच भीती आता वाढत आहे …
म्हणूनच पुन्हा त्याच वेळेची आठवण येत आहे ….
आता office मध्ये पण कामात चिडचिड होते ..
कामामुळे सगळी वेळ खोटी होते
पण चांगली वेळ येण्याची वाट पाहावी लागते
त्यामुळे पुन्हा त्याच वेळेची आठवण येत आहे
चहाच्या टपरी वरच चहाची मजा येते ..
पोळी भाजी तर आईच्या हातचीच चांगली वाटते ..
आता पोळी भाजी आणि चहा ची मजा विरळत आहे
आणि त्यामुळेच पुन्हा त्या वेळेची आठवण येत आहे …
वाघ सिह जंगलात राजे असतात
पिंजर्यात त्यांची राजेशाही चालत नसते …
घर आपले नसले कि मन लागत नसते
तरीच पुन्हा त्याच वेळेची आठवण येत असते …
चित्रातल्या प्रतिकृती वास्तव्यात कधी येत नसतात
त्या कलाकाराच्या मनातल्याच असतात
पण त्या मनात वास्तव्यातूनच गेलेल्या असतात
ती वेळ पुन्हा मला आवाज देत आहे …
म्हणूनच त्या वेळेची आठवण येत आहे …
म्हणूनच त्या वेळेची आठवण येत आहे …
ती वेळ कोणती? हा मोठा प्रश्न तुमच्या मनात असेल
त्या वेळी सगळ्या गोष्टी चांगल्या असतील
त्या वेळी सगळ्या इच्छा पूर्ण झालेल्या असतील
पण अशी वेळ खराब अनुभव नंतरच आली असते …
म्हणूनच प्रत्येक वेळ हि पाहिजे तीच वेळ आहे …
आणि त्याच वेळेची पुन्हा पुन्हा आठवण येत आहे …
4 comments:
sahi re..........
sundar!!!
mast e...
kharach khup chhan...
Post a Comment